Friday, 29 March 2019

खोडवा ऊस नियोजन

खोडवा ऊस नियोजन
• ऊस तोडणीनंतर पाचट सरीत दाबून घ्यावे.
• उसाचे बुडखे मोकळे करून धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत व त्यावर ०.१ % बाविस्टीन (कार्बेन्डॅझीम) फवारावे. पाचटावर प्रती हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सुपर फॉस्फेट व १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू शेणखतात अगर कंपोस्ट खतात मिसळून पाचटावर टाकावेत.
• पहिले पाणी दिल्यावर ३-४ दिवसांनी वाफसा आल्यावर हेक्टरी १२५ किलो नत्र (२७० किलो युरिया), ६० किलो स्फुरद (३७५ किलो सुपर फॉस्फेट) व ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत. तसेच झिंक सल्फेट २० किलो फेरस सल्फेट २५ किलो प्रती हेक्टरी याप्रमाणे द्यावीत.
• किडग्रस्त/ तणग्रस्त क्षेत्र असल्यास खोडवा ठेऊ नये. तसेच कमीत कमी १ लाख उसाची संख्या असलेल्या क्षेत्राचाच खोडवा ठेवावा. खोडव्यात गवताळ वाढीची बेटे असल्यास काढून टाकावीत.
• खोडकीडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.

Thursday, 28 March 2019

फळबागांमध्ये अच्छादन वापराचे फायदे


फळबागांमध्ये अच्छादन वापराचे फायदे

उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते. आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते.
 आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भुसा, उसाचे पाचट, गव्हाचे काड, भाताचे तुस अशा सेंद्रिय घटकांचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ सें.मी असावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादन वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
 पॉलिथीन फिल्मच्या आच्छादनामुळे तणांची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
  सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते, भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरित्या उपयोग होतो.
 आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविता येतो. आच्छादनांमुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते.

जगातील सगळ्यात छोटी आनी जास्त दुध देनारी गाय.

जगातील सगळ्यात छोटी वेचूर गाय


- हिचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय बुटकी आणि कमी लांबी म्हणजे केवळ सरासरी १२४ सेमी लांबी (४ फूट) आणि ८७ सेमी उंची (३ फूट). जगातील सगळ्यात छोटी जात आहे.
- हलक्या लाल रंगाची जनावरे असतात. छोटी आणि पुढे येणारी शिंगे असतात.
-  हि गाय उष्ण आणि आर्द्र हवामानात तग धरून ठेवण्याची खासियत. उंचीच्या मानाने भरपूर दूध देते.
- वर्षाकाठी सरासरी ५६१ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ४.७ – ५.८ % लागते.

Saturday, 23 March 2019

दशपर्नी आर्क कसा बनवायचा?

दशपर्णी अर्क कीडनाशक आहे. याचा उपयोग सेन्द्रिय शेतीमध्ये केला जातो. यात दहा प्रकारच्या पानांचा अर्क वापरल्या जातो.

याचे प्रमाण साधारणत: खालील प्रमाणे असते:

🍃कडुलिंबाची पाने - ५ किलो
🍃करंजाची पाने - २ किलो
🍃निर्गुडीची पाने - २ किलो
🍃टनटनीची पाने - २ किलो
🍃सिताफळाची पाने - ३ किलो
🍃रुईची पाने - २ किलो
🍃लाल कन्हेराची पाने - २ किलो
🍃पपईची पाने -२ किलो
🍃मोगली एरंडाची पाने - २ किलो
🍃गुळवेलीची पाने - २ किलो
🍃गायीचे शेण - २ किलो
🍃गोमुत्र - ५ लिटर
पाणी - १७० लिटर
असा तयार केलेला १२५ मिलि अर्क हा १० लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करतात.

केळी खत नियोजन

• मुख्य खोडालगत आलेली पिले धारदार विळीने जमिनीलगत कापावी. तण व कापलेली पिले खोडालगत ठेऊन त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा.

• लागवडीनंतर पाचव्या व सातव्या महिन्यात झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी १५ ग्रॅम प्रती झाड शेणखतात मुरवून द्यावे.

• एक हजार केळी झाडांसाठी प्रती आठवडा साडे तेरा किलो युरिया व साडे आठ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ड्रीप मधून सोडावे.

• पाण्याचा ताण पडू न देता १८ ते २० लिटर पाणी प्रती झाड प्रती दिवस द्यावे.

• केळी लागवडीनंतर १६५ दिवसांनी १० ग्रॅम बेंटोनाईट सल्फर द्यावे किंवा पाच ग्रॅम प्रती झाड मायक्रोग्रॅन्युलर सल्फर द्यावे.

Friday, 22 March 2019

2025 पर्यंत 87% लोकांना कॅन्सर होणार & मरणार (WHO)

2025 पर्यंत 87% लोकांना कॅन्सर होणार & मरणार  (WHO)

            कॅन्सर
पैसेवाला असो, की गरीब,
उदयोगपति असो की रोडपति,
व्यापारी असो , की नोकरिवर्ग,
जनता असो की,  नेता,
स्री असो, की पुरुष,
भारत असो की अमेरिका, किंवा जगातील कोणताही देश.
संत असो महंत
गुरु असो की शिष्य,
शहरी असो की ग्रामीण,
कॅन्सर कोणालाच सोडणार नाही !

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (World Health Organization ) चे म्हणणे आहे की, 2025 पर्यन्त जगात 87% पब्लिक कॅन्सर ग्रस्त असेल.कोण कोण वाचेल ? विचार करा,

काय  होईल मानव जातीचे ?
याला जबाबदार कोण .50 वर्षा पूर्वी इंजेक्शन घेणारी व्यक्ति शोधून सापडत नव्हती, आता इंजेक्शन ना घेतलेली व्यक्ति शोधून सापडत नाही,

डायबिटीस, एसिडिटी, थायरॉइड, बी पी, ब्लॉकेज, कॅन्सर  असे कितीतरी आजारांचे नावे सांगता येतील, विश्वास  नाही होणार, पण शहरात आज टेस्ट ट्यूब बेबी सेंटर चे बोर्ड पाहायला मिडतात,
कारण.?

कारण 40% लोक नपुंसक झालेत, आणि हे प्रमाण वाढतच आहे, 2040 पर्यन्त लोकसंख्या वाढवण्याचे  कार्य सरकारला हाती घ्यावे लागेल, मुले जन्माला घालण्यासाठी बक्षीसे द्यावी लागणार. कारण मानव कल्याण !

कॅन्सर  कोणालाच नाही सोडणार !

माननीय वित्त मंत्री बजेट पेश करू शकले नाहीत, कारण :- कैन्सर ची ट्रीटमेंट घ्यायला प्रदेशात गेलेत,
सर्वात श्रीमंत, बिल गेट्स चा पार्टनर, कमी वयात  निधन झाले, कारण :- कॅन्सर ,



फ़िल्म इंडस्ट्री घ्या, अभिनेत्री
नरगिस च्या नावाने कॅन्सर  हॉस्पिटल, का,? तर नारगिसचा मृत्यु कॅन्सर  मुळे झाला होता,

अभिनेता राकेश रोशन कॅन्सर  ग्रस्त, मनीषा कोइराला कॅन्सर  ग्रस्त, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, विचारवंत कॅन्सरग्रस्त ! अजून बरेच नावे आहेत,

कॅन्सर  कोणाचलाच सोड़नार नाही !

मानव सृष्टिला वाचवण्यचा एकच पर्याय आहे,

जो तुमच्या, आपल्या जवळ आहे,
आणि तो म्हणजे, गाय, म्हशी, जनावराच्या शेणखताची शेती.

रसायनमुक्त शेती
रसायनमुक्त पिक
रसायनमुक्त अन्न
रसायनमुक्त पाणी
रसायनमुक्त औषधे
रसायनमुक्त उपचार
रसायनमुक्त घर
रसायनमुक्त परीवार
———————
शुध्द नैसर्गिक अन्न मिळायलाच हवे.
-------------------------
*म्हणून त्वरीत आयुर्वेदिक व जैविक जैविक गोष्टिंकडे वळणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे*.

जनहितार्थ जारी

केळीला पानी देन्याचा टाईमटेबल


केळीला भरपूर पाणी लागते. पाणी खोडाजवळ साठून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक असते. जमिनीचा मगदूर व झाडांच वय लक्षात घेवून पाण्‍याचे पाळयामधील अंतर ठरवितात. भारी सुपिक व खोल जमिनीतील पिकांना 7 ते 10 सेमी पाणी दरपाळीस लागते. उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांनी व हिवाळयात 9 ते 15 दिवसांनी पाणी देतात. अतिकडक उन्‍हाळयात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे लागते.
केळीचे एक पिक घेण्‍यास (18 महिने) 45 ते 70 पाण्‍याच्‍या पाळया लागतात. पाण्‍याची कमतरता असल्‍यास केळीच्‍या वाफयाच्‍या मधल्‍या जागेत तनिस, गवत, पालापाचोळा व पॉलीथीनचे लांब तुकडे यांचे आच्‍छादन करावे. त्‍यामुळे पाण्‍याच्‍या दोन पाळया चुकविता येतात.

योजनेचा फायदा कोनाला?

'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजने अंतर्गत, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर  १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जमीनची नोंदणी आहे, त्यांनाच दरवर्षी ६ हजार रक्कम मिळेल. या तारखेनंतर, जमिनीची खरेदी व विक्री झाल्यानंतर जमीन कागदपत्रांमध्ये काही बदल झाला, तर  पुढील ५ वर्षे पंतप्रधान किसान सन्मान निधी  योजने अंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तथापि, जर जमीन हस्तांतरणात कुटूंबातील एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर झाली, तर तो या योजनेसाठी लाभार्थी मानला जाईन. यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची योजना 'पीएम-किसान पोर्टल' www.pmkisan.gov.in वर अपलोड केली जाईल. अशा परिस्थितीत, ज्या शेतकऱ्यांना असे वाटते की, या योजने अंतर्गत समावेश होऊ शकतो, पण या योजनेमध्ये नाव नाही, त्यांना ते याविषयी मंडल अधिकाऱ्यांजवळ तक्रार नोंदवू शकतात.

Thursday, 21 March 2019

जैविक किटकनाशकांचे महत्व

बरेच शेतकरी पिकावर रासायनिक किटकनाशकांचा वापर करतात
त्यामुळे पिकावर आनी निसर्गावरही वाईट परिनाम होतो.
किडींच्या सुरुवातीच्या आवस्थेत त्या जैविक किटकनाशकानेसुद्धा नष्ठ करता येतात.
म्हणूनच आज काही कवक आधारीत जैव-कीटकनाशकांचा वापर व माहिती जाणून घेउयात.

१. ट्रायकोडर्मा- हे बुरशीजन्य जैव-कीटकनाशके जमिनीत जन्मलेल्या हानीकारक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवू शकतात. जसे की, मूळकुज, खोडकुज इ. यामध्ये तीळ, मुग, उडीद ,खरबूज व इतर भाजीपाला यांचा समावेश आहे.
२. बवेरिया बेसियाना – हे एक कवक आधारित जैविक कीटकनाशक लष्करी अळी, तुडतुडे ,पाने खाणाऱ्या अळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात तसेच पिकांचे नुकसान करणाऱ्या रसशोषक किडींवर नियंत्रणदेखील ठेवतात.
३.  मेटारायझिम अँन्सिपोल – हे जैविक कीटकनाशक वाळवी ,हुमणी ,थ्रीप्स, इत्यादी किडींवर नियंत्रण करतात तसेच मातीमधील किडींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानवरदेखील प्रभावी नियंत्रण ठेवतात.
४. सुडोमोनस फ्लोरोसन्स – हे  जैविक कीटकनाशक पिकांवरील बुरशीजन्य रोग, काळी बुरशी व मातीमधील बुरशींवर प्रभावी नियंत्रण ठेवतात.
५. पॅसिलोमायसेस- हे जैविक कीटनाशक कांदा ,मिरची ,काकडी ,खरबूज ,कलिंगड ,भाजीपाला , डाळिंब आणि इत्यादी पिकांमधील सुत्रकृमीवर प्रभावी नियंत्रण करतात.
६. बॅसिलस थुरीन्जेसीस – याचा उपयोग पिकांचे नुकसान करणाऱ्या अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी केला जातो

Tuesday, 19 March 2019

आकोटमध्ये आज 6400 रूपये पर क्विंटलने कापूस खरेदी

आज दिनांक 19-03-2019
आकोला जिल्ह्यातील आकोट बाजार समितीमध्ये आज 6400 रुपये प्रती क्विंटलने कापूस खरेदी करन्यात आला ,पावती👇👇👇
हि पोष्ट आपल्या whatsapp वर शेयर करा

मुर्रा आनी भदावरी या म्हशींच्या जातीची माहीती

म्हैस ही एक दुधाळ जनावर आहे. आज म्हशीच्या जातीबद्दल माहिती देणार आहोत. कारण सध्या देशात म्हशींच्या मुऱ्हा व भदावरी या जातींची मागणी वाढत आहे.
भदावरी
१.        ही म्हशीची जात मुऱ्हा म्हशीपेक्षा कमी प्रमाणात दुध देते, पण या म्हशीच्या दुधात स्निग्धाचे प्रमाण जास्त असते.
२.        या म्हशीमध्ये दुधाचे प्रमाण ४ ते ५ लिटर असते तसेच स्निग्धचे प्रमाण ८ टक्के पर्यंत असते.
मुऱ्हा
१.        या जातींची म्हशींची डोळे आणि शिंग देशी म्हशीच्या तुलनेत लहान असतात.
२.        या म्हशींची दुध देण्याची क्षमता प्रति दिवस १२ लिटरच्या आसपास असते.
३.        या म्हशीच्या जातीची शिंगे हे पिळलेली असते. शिंगाचे वरील आवरण पातळ असते.
४.        या म्हशीच्या जातीचा शरीर बांधा मोठा व भारदस्त कणखर असतो.कातडी पातळ व हलका काळा रंग असतो.
३.         हे प्रमाण वेगवेगळ्या म्हशीमध्ये ६ ते १२ टक्क्यापर्यंत असते. या जातीच्या म्हशीच्या दुधात असणारे स्निग्धचे प्रमाण देशातील इतर म्हशीच्या प्रमाणापेक्षा जास्त असते.

Monday, 18 March 2019

झेंडु पीकाची लागवड ते आंतरमशागत संपुर्न माहीती

झेंडू
प्रस्‍तावना
झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला जातो.

जमीन व हवामान
झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते. परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या झेन्दुपासून मिळते.

झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. झेन्दुसाठी सुपीक, पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते. ज्या जमिनीचा सामू ७.० ते ७.६ इतका आहे त्या जमिनीत झेंडूचे पीक चांगले येते. झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीतजाती
अ) आफ्रिकन झेंडू: या प्रकारची झेन्दुंची झुडुपे उंच वाढतात. झुडूप काटक असते. पावसालीची हवामानात झुडुपे १०० ते १५० से. मी. पर्यंत उंच वाढतात. फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी असतो. या प्रकारांमध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो. जायंट डबल, आफ्रिकन यलो, ऑरेंज, अर्ली यलो, अर्ली ऑरेंज, गियाना गोल्ड, क्रॅकर जॅक, ऑरेंज ट्रेझंट, बंगलोर लोकल, दिशी सनशाईन, आफ्रिकन टॉल डबल, मिक्स्ड, यलो सुप्रीम, हवाई, स्पॅन गोल्ड, अलास्का, इत्यादी

ब) फ्रेंच झेंडू: या प्रकारातील झेन्डूंची झुडुपे उंचीला कमी असतात व झुडुपासारखी वाढतात. झुडुपांची उन्ह्ची ३० ते ४० से. मी. असते. फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगाची फुले असतात. या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा, तसेच फुलांचा गालीचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात. या प्रकारामध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो. यलो बॉय, हार्मोनी बॉय, लिटल डेव्हिल, बायकलर, बटर स्कॉच, स्प्रे, लेमन ड्वार्फ यलो, रेड मारिटा, हार्मोनी, रॉयल बेंगाल, क्विन, सोफिया, इत्यादी.लागवड पूर्व तयारी
लागवडीपूर्व जमिनीची २ ते ३ वेळा खोलवर नांगरट, २ ते ३ वेळा फणणी करून धसकटे व हरळीच्या काशा वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून ५० किलो नत्र, २०० किलो. स्फुरद व २०० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीच पूर्णपणे मिसळून घ्यावे. व नंतर ६० से. मी. अंतरावर सरी वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर सर्यासची नाके तोडून पाणी पुराव्थाच्या सोयीप्रमाणे वाफे करून घ्यावेत.

लागवड
झेंडूची लागवड करताना ६० से. मी. अंतरावर घेतलेल्या सरीच्या मध्यभागी ३० से. मी. इतके दोन रोपांमधील अंतर ठेवून लागवड करावी. ६० X ३० से. मी. अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४०,००० रोपे लागतात. लागवड करतांना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी ४ नंतर लागवड करावी. म्हणजे रोपांची मर होत नाही.

आंतरमशागत
लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यावेळी नत्र खताचा दुसरा हप्ता ५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणात द्यावा. लागवड केलेला वरंबा फोडून दुसऱ्या वाराम्ब्यास माती लावावी व झाड मध्यभागी घ्यावे. त्याचवेळी रोपाचा शेंडा खुडावा म्हणजे झेंडूच्या रोपास भरपूर फांद्या फुटतात व उत्पादन चांगले येते.

कापसाला मिळतोय5900 रूपयांचा दर

नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे

 नमस्कार आपले स्वागत आहे ! नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे    🛑मुख्य आन्नद्रव्य नत्र, स्फुरद व पालाश हि अत्यंत महत्वाची व प्रथम अन्नद्रव्ये ...