Thursday, 21 March 2019

जैविक किटकनाशकांचे महत्व

बरेच शेतकरी पिकावर रासायनिक किटकनाशकांचा वापर करतात
त्यामुळे पिकावर आनी निसर्गावरही वाईट परिनाम होतो.
किडींच्या सुरुवातीच्या आवस्थेत त्या जैविक किटकनाशकानेसुद्धा नष्ठ करता येतात.
म्हणूनच आज काही कवक आधारीत जैव-कीटकनाशकांचा वापर व माहिती जाणून घेउयात.

१. ट्रायकोडर्मा- हे बुरशीजन्य जैव-कीटकनाशके जमिनीत जन्मलेल्या हानीकारक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवू शकतात. जसे की, मूळकुज, खोडकुज इ. यामध्ये तीळ, मुग, उडीद ,खरबूज व इतर भाजीपाला यांचा समावेश आहे.
२. बवेरिया बेसियाना – हे एक कवक आधारित जैविक कीटकनाशक लष्करी अळी, तुडतुडे ,पाने खाणाऱ्या अळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात तसेच पिकांचे नुकसान करणाऱ्या रसशोषक किडींवर नियंत्रणदेखील ठेवतात.
३.  मेटारायझिम अँन्सिपोल – हे जैविक कीटकनाशक वाळवी ,हुमणी ,थ्रीप्स, इत्यादी किडींवर नियंत्रण करतात तसेच मातीमधील किडींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानवरदेखील प्रभावी नियंत्रण ठेवतात.
४. सुडोमोनस फ्लोरोसन्स – हे  जैविक कीटकनाशक पिकांवरील बुरशीजन्य रोग, काळी बुरशी व मातीमधील बुरशींवर प्रभावी नियंत्रण ठेवतात.
५. पॅसिलोमायसेस- हे जैविक कीटनाशक कांदा ,मिरची ,काकडी ,खरबूज ,कलिंगड ,भाजीपाला , डाळिंब आणि इत्यादी पिकांमधील सुत्रकृमीवर प्रभावी नियंत्रण करतात.
६. बॅसिलस थुरीन्जेसीस – याचा उपयोग पिकांचे नुकसान करणाऱ्या अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी केला जातो

No comments:

Post a Comment

नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे

 नमस्कार आपले स्वागत आहे ! नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे    🛑मुख्य आन्नद्रव्य नत्र, स्फुरद व पालाश हि अत्यंत महत्वाची व प्रथम अन्नद्रव्ये ...