Tuesday, 2 April 2019

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस-हवामनतज्ञ रामचंद्र साबळे

वरुणराजा यंदा प्रसन्न : डॉ. रामचंद्र साबळे

 गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर वरुणराजा यंदा प्रसन्न होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या सर्वच भागात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. हवेचा दाब कमी होण्यास सुरुवात झाली असून, भिरा, अकोला, मालेगाव, चंद्रपूर येथील कमाल तापमान 42 अंशांच्या पुढे नोंदविले जात आहे. या चारही शहरातील कमाल तापमान गेले 9-10 दिवस सातत्याने सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले असून, दमदार पावसासाठी ते निदर्शक (इंडिकेटर) असल्याचे मत डॉ. साबळे यांनी व्यक्त केले.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अरबी समुद्रावरून वारे वाहू लागले आहेत. अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वार्‍याचा प्रवास सुरू झाला असून, नैऋ त्य दिशेने वारे वाहत असल्याने राज्यात समाधानकारक पावसाबरोबरच मान्सूनदेखील वेळेवरच दाखल होणार आहे. समाधानकारक पाऊस पडेल, हा पूर्व अंदाज (पूर्वानुमान) असून, दि. 15 मे नंतरच राज्याच्या कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याबाबतचा तपशील कळू शकेल, असेही डॉ. साबळे म्हणाले.
दरम्यान, एल-निनोमुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत विचारले असता डॉ. साबळे म्हणाले, एल-निनोसंदर्भात माध्यमांमध्ये विविध संस्थांच्या अंदाजावरून आलेल्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम व भीती निर्माण झाली आहे. परंतु, एल-निनोचा राज्यासह देशावर काहीच परिणाम जाणवणार नसून, यंदा पर्जन्यमान सुधारेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे

 नमस्कार आपले स्वागत आहे ! नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे    🛑मुख्य आन्नद्रव्य नत्र, स्फुरद व पालाश हि अत्यंत महत्वाची व प्रथम अन्नद्रव्ये ...