Monday, 13 May 2019

नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे

 नमस्कार
आपले स्वागत आहे !
नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे
   🛑मुख्य आन्नद्रव्य
नत्र, स्फुरद व पालाश हि अत्यंत महत्वाची व प्रथम अन्नद्रव्ये आहे
🛑  नत्र

 👉नत्र हे अधिक फुटवा येण्यासाठी तसेच हिरवेपणा व काळोखी आणण्याचे कार्य करते.
👉यामुळे पिक हिरवेगार होते.
👉पिकाची झपाट्याने वाढ होते
🛑स्फुरद

👉स्फुरद हे फुलधारणेसाठी व फळधारणा होण्यासाठीचे कार्य करते

🛑पालाश
👉पालाश हे फळाच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच फुगवण होण्यसासाठी कार्यरत असते.
👉फळांची साईझ वाढवते
👉फळांचा आकार ,चकाकी वाढवन्याचे काम पालाश करते. 

Tuesday, 2 April 2019

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस-हवामनतज्ञ रामचंद्र साबळे

वरुणराजा यंदा प्रसन्न : डॉ. रामचंद्र साबळे

 गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर वरुणराजा यंदा प्रसन्न होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या सर्वच भागात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. हवेचा दाब कमी होण्यास सुरुवात झाली असून, भिरा, अकोला, मालेगाव, चंद्रपूर येथील कमाल तापमान 42 अंशांच्या पुढे नोंदविले जात आहे. या चारही शहरातील कमाल तापमान गेले 9-10 दिवस सातत्याने सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले असून, दमदार पावसासाठी ते निदर्शक (इंडिकेटर) असल्याचे मत डॉ. साबळे यांनी व्यक्त केले.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अरबी समुद्रावरून वारे वाहू लागले आहेत. अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वार्‍याचा प्रवास सुरू झाला असून, नैऋ त्य दिशेने वारे वाहत असल्याने राज्यात समाधानकारक पावसाबरोबरच मान्सूनदेखील वेळेवरच दाखल होणार आहे. समाधानकारक पाऊस पडेल, हा पूर्व अंदाज (पूर्वानुमान) असून, दि. 15 मे नंतरच राज्याच्या कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याबाबतचा तपशील कळू शकेल, असेही डॉ. साबळे म्हणाले.
दरम्यान, एल-निनोमुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत विचारले असता डॉ. साबळे म्हणाले, एल-निनोसंदर्भात माध्यमांमध्ये विविध संस्थांच्या अंदाजावरून आलेल्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम व भीती निर्माण झाली आहे. परंतु, एल-निनोचा राज्यासह देशावर काहीच परिणाम जाणवणार नसून, यंदा पर्जन्यमान सुधारेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Friday, 29 March 2019

खोडवा ऊस नियोजन

खोडवा ऊस नियोजन
• ऊस तोडणीनंतर पाचट सरीत दाबून घ्यावे.
• उसाचे बुडखे मोकळे करून धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत व त्यावर ०.१ % बाविस्टीन (कार्बेन्डॅझीम) फवारावे. पाचटावर प्रती हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सुपर फॉस्फेट व १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू शेणखतात अगर कंपोस्ट खतात मिसळून पाचटावर टाकावेत.
• पहिले पाणी दिल्यावर ३-४ दिवसांनी वाफसा आल्यावर हेक्टरी १२५ किलो नत्र (२७० किलो युरिया), ६० किलो स्फुरद (३७५ किलो सुपर फॉस्फेट) व ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत. तसेच झिंक सल्फेट २० किलो फेरस सल्फेट २५ किलो प्रती हेक्टरी याप्रमाणे द्यावीत.
• किडग्रस्त/ तणग्रस्त क्षेत्र असल्यास खोडवा ठेऊ नये. तसेच कमीत कमी १ लाख उसाची संख्या असलेल्या क्षेत्राचाच खोडवा ठेवावा. खोडव्यात गवताळ वाढीची बेटे असल्यास काढून टाकावीत.
• खोडकीडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.

Thursday, 28 March 2019

फळबागांमध्ये अच्छादन वापराचे फायदे


फळबागांमध्ये अच्छादन वापराचे फायदे

उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते. आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते.
 आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भुसा, उसाचे पाचट, गव्हाचे काड, भाताचे तुस अशा सेंद्रिय घटकांचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ सें.मी असावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादन वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
 पॉलिथीन फिल्मच्या आच्छादनामुळे तणांची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
  सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते, भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरित्या उपयोग होतो.
 आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविता येतो. आच्छादनांमुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते.

जगातील सगळ्यात छोटी आनी जास्त दुध देनारी गाय.

जगातील सगळ्यात छोटी वेचूर गाय


- हिचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय बुटकी आणि कमी लांबी म्हणजे केवळ सरासरी १२४ सेमी लांबी (४ फूट) आणि ८७ सेमी उंची (३ फूट). जगातील सगळ्यात छोटी जात आहे.
- हलक्या लाल रंगाची जनावरे असतात. छोटी आणि पुढे येणारी शिंगे असतात.
-  हि गाय उष्ण आणि आर्द्र हवामानात तग धरून ठेवण्याची खासियत. उंचीच्या मानाने भरपूर दूध देते.
- वर्षाकाठी सरासरी ५६१ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ४.७ – ५.८ % लागते.

Saturday, 23 March 2019

दशपर्नी आर्क कसा बनवायचा?

दशपर्णी अर्क कीडनाशक आहे. याचा उपयोग सेन्द्रिय शेतीमध्ये केला जातो. यात दहा प्रकारच्या पानांचा अर्क वापरल्या जातो.

याचे प्रमाण साधारणत: खालील प्रमाणे असते:

🍃कडुलिंबाची पाने - ५ किलो
🍃करंजाची पाने - २ किलो
🍃निर्गुडीची पाने - २ किलो
🍃टनटनीची पाने - २ किलो
🍃सिताफळाची पाने - ३ किलो
🍃रुईची पाने - २ किलो
🍃लाल कन्हेराची पाने - २ किलो
🍃पपईची पाने -२ किलो
🍃मोगली एरंडाची पाने - २ किलो
🍃गुळवेलीची पाने - २ किलो
🍃गायीचे शेण - २ किलो
🍃गोमुत्र - ५ लिटर
पाणी - १७० लिटर
असा तयार केलेला १२५ मिलि अर्क हा १० लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करतात.

केळी खत नियोजन

• मुख्य खोडालगत आलेली पिले धारदार विळीने जमिनीलगत कापावी. तण व कापलेली पिले खोडालगत ठेऊन त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा.

• लागवडीनंतर पाचव्या व सातव्या महिन्यात झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी १५ ग्रॅम प्रती झाड शेणखतात मुरवून द्यावे.

• एक हजार केळी झाडांसाठी प्रती आठवडा साडे तेरा किलो युरिया व साडे आठ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ड्रीप मधून सोडावे.

• पाण्याचा ताण पडू न देता १८ ते २० लिटर पाणी प्रती झाड प्रती दिवस द्यावे.

• केळी लागवडीनंतर १६५ दिवसांनी १० ग्रॅम बेंटोनाईट सल्फर द्यावे किंवा पाच ग्रॅम प्रती झाड मायक्रोग्रॅन्युलर सल्फर द्यावे.

नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे

 नमस्कार आपले स्वागत आहे ! नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे    🛑मुख्य आन्नद्रव्य नत्र, स्फुरद व पालाश हि अत्यंत महत्वाची व प्रथम अन्नद्रव्ये ...